मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर उद्या 6 तास वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर उद्या 6 तास वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्या 6 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्या 6 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चिखले ब्रिज येथे १८ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजता काम करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई मार्गिकेवर मुंबई रेल्वे विकास कॉपरिशनतर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरचे काम हाती घेतले आहे.

पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग आणि रेल्वे कॉरिडोरचे कामासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. ब्लॉक काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने पनवेल एक्झिटवरून वळवून महामार्ग क्रमांक ४८ वरून करंजाडेमार्गे कळंबोली तर महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने शेडंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने रवाना होतील.

तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई मार्गिका किमी ५५.००० वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून जातील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com