Mumbai Residents Use Water Sparingly 10 Percent Water Cut In These Areas From January 27th
Mumbai Residents Use Water Sparingly 10 Percent Water Cut In These Areas From January 27th

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो सावध व्हा! 27 जानेवारीपासून ‘या’ भागांत पाणी कपात

२७ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच ठाणे आणि भिवंडीतील काही भागांत १० टक्के पाणी कमी मिळणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पिसे येथील पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्ती आणि देखभाल कामामुळे मुंबईत काही दिवस पाण्याचा ताण जाणार आहे. २७ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच ठाणे आणि भिवंडीतील काही भागांत १० टक्के पाणी कमी मिळणार आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठ्यासाठी वापरली जाणारी विशेष गेट प्रणाली तपासणीसाठी बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आधीच पाण्याची अडचण भासत असलेल्या पूर्व उपनगरातील नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

शहरातील अनेक भागांसह मुलुंड, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला आणि चेंबूर परिसरात पाणी कपात जाणवेल. या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अनावश्यक वापर टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. काही दिवसांचा हा त्रास समजून घेऊन पाणी साठवणूक आणि काटकसरीचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला मुंबईकरांना देण्यात आला आहे.

थोडक्यात

  1. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; काही दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम.

  2. पिसे येथील पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभाल कामामुळे निर्णय.

  3. २७ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा कमी राहणार.

  4. मुंबई शहरात पाण्याचा ताण जाण्याची शक्यता.

  5. पूर्व उपनगरांतील काही भागांवरही परिणाम.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com