ताज्या बातम्या
Mumbai : मुंबईकरांनो सावधान..! तापमानाचा पारा आणखी वाढणार
राज्यात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढलेला राहणार आहे.
राज्यात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढलेला राहणार आहे. मुंबई शहर व उपनगरांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे.
मुंबईतील उष्णतेत कमालीची वाढ झाली असून तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी तापमान 37.2 अंशांवर होते. पुढचे काही दिवस देखील उन्हाच्या झळा बसणार आहेत.
पुढील काही दिवस तापमानाता पारा हा वाढताच राहणार असल्याची माहिती हवामाना विभागाकडून देण्यात आली आहे.