BMC Election 2025 : मुंबई-ठाणे महापालिका निवडणुका 31 जानेवारीपूर्वी; आयोगाचे संकेत

BMC Election 2025 : मुंबई-ठाणे महापालिका निवडणुका 31 जानेवारीपूर्वी; आयोगाचे संकेत

राज्यातील प्रतिक्षित मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अखेर स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2025 आधी सर्व महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • 31 जानेवारी 2025 आधी सर्व महापालिका निवडणुका घेण्यात येणार

  • सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

  • मुंबईत सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे पाहणे महत्त्वाचे

राज्यातील प्रतिक्षित मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अखेर स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2025 आधी सर्व महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत. यात मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांचाही समावेश आहे.

आयोगाने सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार असून निकाल 3 डिसेंबरला लागतील. मात्र मुंबई-ठाणे पालिकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु 31 जानेवारीपूर्वी निवडणुका निश्चित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

मुंबई निवडणुकीचे महत्त्व

मुंबई महानगरपालिका गेली अनेक दशके शिवसेनेच्या ताब्यात होती. पक्षातील फुटीनंतर आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे-भाजपा यांच्यात चुरस वाढली आहे. मुंबईत सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाण्यातही तगडी लढत

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी भाजप-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. ठाण्यात शिंदे आपली पकड टिकवणार की ठाकरे गट जोरदार परतीचा प्रयत्न करणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका आता केवळ तारखेची औपचारिक घोषणा बाकी असताना राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com