BEST : बेस्टच्या बस भाड्यात मोठा बदल, प्रवाशांना मिळणार दिलासा

BEST : बेस्टच्या बस भाड्यात मोठा बदल, प्रवाशांना मिळणार दिलासा

शेअर ऑटोच्या स्पर्धेत बेस्टची पुढाकार, भाडे कमी करण्याचा विचार
Published by :
Shamal Sawant
Published on

बसच्या भाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे मुंबईमधील प्रवाशांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मुंबईकरांनी त्यावर मार्ग काढत शेअर ऑटो चा पर्याय निवडला होता. परिणामी बसमधील प्रवाशांची संख्या कमी होऊ लागली होती त्यावर बेस्ट च्या अधिकाऱ्यांनी नवीन पर्याय शोधुन काढला आहे. बेस्टचे भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक (बेस्ट) प्रशासन एसी आणि नॉन-एसी बसेसचे किमान भाडे कमी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे किमान प्रवाशांना पुन्हा एकदा बस प्रवासाकडे आकर्षित करण्यासाठी हा नवा फंडा बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. लवकरच या प्रस्तावावर काही ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.आधी एसी बसेसचे किमान भाडे आता 12 रुपये इतके होते आणि नॉन-एसी बसेसचे किमान भाडे 10 रुपये इतके होते आता त्यामध्ये थोडे बदल करण्याचा विचार चालू असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले.

आता 3 किमी पर्यंतच्या लहान मार्गांवर, एसी बस चे भाडे 12 वरून 9 रुपयांपर्यत आणि नॉन एसी बस चे भाडे 10 रुपयांवरून 7 रुपयांवर करण्याचा विचार आहे. त्यामुळे परिणामी जे प्रवासी सध्या शेअर ऑटो चा पर्याय निवडत आहेत त्यांना पुन्हा एकदा बसकडे वळवले जाऊ शकते. तसेच यामध्ये अजुन बदल केले जाऊन ऑटो चे स्पर्धात्मक भाडे ही विचारात घेतले जाऊन त्याद्वारे बस चे भाडे कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com