Mumbai University
Mumbai UniversityTeam Lokshahi

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नसल्यामुळे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड प्रक्रियेला विलंब

विद्यापीठाचे एकमेव अधिकारी कुलसचिव हे मोठ्या आजारामुळे दीर्घकालीन सुट्टीवर आहेत.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई |संजय गडदे : मुंबई विद्यापीठ कुलगुरूंची मुदत ७ सप्टेंबर २०२२ रोजी संपुष्टात येत असुन त्यांच्या सोबत प्र कुलगुरु, अधिष्ठाता आणि तत्सम अधिकाऱ्यांची मुदत संपणार आहे.0 उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नसल्यामुळे शासनाचा प्रतिनिधी नाही या कारणास्तव नविन कुलगुरु निवड प्रक्रिया अशक्य आहे. त्यामुळे आता विद्यापीठ वाऱ्यावर राहणार का असा सवाल उपस्थित होतोय.

Mumbai University
"...कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा"; CM शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर मनिषा कायंदेंची टीका

विद्यापीठाचे एकमेव अधिकारी कुलसचिव हे मोठ्या आजारामुळे दीर्घकालीन सुट्टीवर आहेत तर परिक्षा नियंत्रक आणि मूल्यमापन संचालक विनोद पाटील यांची नियुक्ती कुलसचिव,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथे करण्यात आली आहे आणि त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे तत्पूर्वी सिनेट सदस्यांची मुदत देखिल ३१ ऑगस्ट,२०२२ रोजी संपणार असल्यामुळे कोविड 19 नंतर तब्बल दोन वर्षाने सुरु होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावे लागल्यास त्यांना कोणीच ' वाली ' नसणार आहे, म्हणुन संभाव्य तक्रारींचा निवारण होणेकरिता मान.

राज्यपाल तथा कुलपती, महाराष्ट्र विद्यापीठे यांच्याकडे युवासेना सदस्यांनी चर्चेसाठी अनेकदा वेळ मागितली आहे. परंतु अजुन काही निरोप आलेला नाही तरी कुलपती महोदयांनी याची गंभीर दखल घेऊन वेळ द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com