मुंबई विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू; 'या' नावांची चर्चा
Admin

मुंबई विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू; 'या' नावांची चर्चा

मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या गेल्या.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या गेल्या. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू मिळणार आहेत. मुलाखतीतून पाच नाव राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत.

या पाच नावांपैकी एका नावाची राज्यपाल कुलगुरू म्हणून निवड करतील. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेमध्ये 80 जणांनी सहभाग घेतला होता.तेज प्रताप सिंग - बीएचयु ( बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक, ज्योती जाधव - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, सुरेश गोसावी - भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अर्चना शर्मा - भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, प्रा. रवींद्र कुलकर्णी - मुंबई विद्यापीठाची माजी प्र कुलगुरू या नावांची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com