मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात होणार पाणीकपात

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात होणार पाणीकपात

मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण मुंबईतील काही भागांत पाणीकपात करण्यात येणार आहे. सोमवारपासून ही पाणीकपात केली जाणार आहे. सोमवारी 18 डिसेंबर रोजी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.किसननगर नं. 2, नेहरूनगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गावइथल्या पाणीपुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबईकर आणि ठाण्यातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दिवा मुंब्र्यातील प्रभाग 26 आणि 31 चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग तसेच वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा. ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभागा अंतर्गत येणाऱ्या भागात पाणी कपात होणार आहे. मुंबई महापालिकेच्या ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com