मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट; पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा घटला

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट; पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा घटला

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. तीव्र पाणीटंचाई जाणवत असून अनेक ठिकाणी तर पाणीच येत नसल्याची माहिती मिळत आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत केवळ 39 टक्के पाणीसाठा उरला असून सध्या धरणांमध्ये 609740 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईवर मार्चमध्येच पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावले आहे. यासोबतच सातही तलावांतील पाणीसाठा कमी होत चालला आहे. मुंबईकरांच्या घशाला कोरड पडली आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना पाण्याचे टँकर मागवण्यात येत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com