Mumbai : मुंबईतील समुद्र खवळला; 'या' चौपाट्यांवर बंदोबस्त तैनात

Mumbai : मुंबईतील समुद्र खवळला; 'या' चौपाट्यांवर बंदोबस्त तैनात

बिपरजॉय चक्रीवादळाचा सगळीकडे मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बिपरजॉय चक्रीवादळाचा सगळीकडे मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी या चक्रिवादळामुळे नुकसान देखिल झालं आहे. या चक्रिवादळाचा आता मुंबईवरही परिणाम दिसू लागला आहे.

मुंबईच्या सर्व चौपाट्या बंद करण्यात आल्या आहेत. समुद्राला भरती आली आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहे. बिपरजॉय आता समुद्रात ज्या ठिकाणी आहे, तिथं वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी एवढा आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी करण्यात आली आहे.गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणार आहेत. चौपाटींवर येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून बाहेर जाण्याचा आवाहन केलं जात आहे. चौपाट्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून जीवरक्षक तैनात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com