Auto-Taxi Fare
Auto-Taxi Fare

Auto Rickshaw, Taxi Fare : मुंबईकरांचा प्रवास आता महागणार, ऑटो रिक्षा, टॅक्सीच्या दरात वाढ

मुंबईकरांचा प्रवास आता महागणार, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ. खटुआ समितीने प्रस्तावित केलेल्या वाढीमुळे प्रवाशांना जास्त खर्च येणार.
Published on

मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे. ऑटो रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रेल्वेच्या नंतर मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. ते म्हणजे रिक्षा किंवा टॅक्सी. पण आता त्याच रिक्षा, टॅक्सीच्या भाडे वाढीचा प्रस्ताव खटुआ समितीने केला आहे. त्याप्रमाणे टॅक्सीचा दर ४ प्रति किमीने तर रिक्षाचा दर ३ प्रति किमीने वाढण्यासाठी संघटनेने मागणी केली आहे. त्याचप्रमाणे टॅक्सीचा दर हा २८ वरुन ३२ वर जाणार आहे, तर रिक्षाचा दर हा २३ वरुन २६ वर जाईल.

अॅपवरुन बुकिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम रिक्षा चालकांवर झाला आहे. वाढत्या सीएनजी भावामुळे आणि रिक्षाच्या दुरुस्तीचा खर्च वाढल्याने चालकांला हे परवडत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

२०२२ मध्ये भाडेवाढ झाली होती. तेव्हा २ रुपयांने भाडेवाढ झाली होती. रिक्षा पहिला मीटर हा २१ होता त्यावरून तो २३ रुपये झाला होता आणि टॅक्सीचा दर हा २५ रुपये होता. त्यावरून तो २८ रुपये झाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com