BMC Election
BMC ElectionBMC Election

BMC Election : महापालिका निवडणुकीचा फुल फॉर्म्युला! कोण कुठे किती जागांवर? A–Z माहिती

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत संपली आहे. सर्व प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारांनीही आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत संपली आहे. सर्व प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारांनीही आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले. अनेक ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि स्वतंत्र लढती पाहायला मिळत आहेत. काही शहरांमध्ये युती व आघाड्या झाल्या असल्या तरी काही पक्षांनी एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्येक महापालिकेत कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार, हे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील प्रमुख शहरांमधील सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे.

ठाणे महानगरपालिका (एकूण 131 जागा)

शिवसेना – 87

भाजप – 40

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 75 (स्वतंत्र)

काँग्रेस – 100 (स्वतंत्र)

मनसे – 34

शिवसेना (ठाकरे गट) – 53

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 36

नागपूर महानगरपालिका (151 जागा)

भाजप – 143

शिवसेना – 8

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 94

काँग्रेस – 151

शिवसेना (ठाकरे गट) – 10 (अंतिम आकडे येणे बाकी)

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 64

मनसे – 15

एमआयएम – 3 (आकडे अपूर्ण)

बसपा – 8 (आकडे अपूर्ण)

वंचित – 75

चंद्रपूर महानगरपालिका (66 जागा)

भाजप – 58

शिवसेना – 8

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 40 (स्वतंत्र)

काँग्रेस – 63

जनविकास सेना – 3

मनसे – 25 (स्वतंत्र)

शिवसेना (ठाकरे गट) – 33

वंचित – 33

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 55

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (128 जागा)

भाजप + आरपीआय (आठवले गट) युती

भाजप – 123

आरपीआय – 5

राष्ट्रवादी (दोन्ही गट)

अजित पवार गट – 110

शरद पवार गट – 18 (दोन प्रभागांत मैत्रीपूर्ण लढत)

शिवसेना – काही जागांवर स्वतंत्र लढत

शिवसेना (ठाकरे गट) + मनसे + रासप युती

शिवसेना (ठाकरे) – 63

मनसे – 19

रासप – 3

काँग्रेस – 60 (स्वबळावर लढण्याची शक्यता)

आम आदमी पार्टी – सुमारे 40 जागा

वंचित बहुजन आघाडी – काही जागांवर स्वतंत्र उमेदवार

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (115 जागा)

भाजप – 95

शिवसेना – 87

शिवसेना (ठाकरे गट) – 89

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 82

वंचित – 70

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 22

लातूर महानगरपालिका (70 जागा)

भाजप – 70

काँग्रेस – 65

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 60

शिवसेना – 11

वंचित – 5

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 17

शिवसेना (ठाकरे गट) – 9

जालना महानगरपालिका (65 जागा)

भाजप – 64

आरपीआय – 1

शिवसेना – 65

राष्ट्रवादी + वंचित + मनसे युती

राष्ट्रवादी – 50

मनसे – 6

महाविकास आघाडी

काँग्रेस – 40

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 13

शिवसेना (ठाकरे गट) – 12

मालेगाव महानगरपालिका (84 जागा)

शिवसेना – 24

भाजप – 20

एमआयएम – 57

इस्माईल पार्टी – 45

समाजवादी पार्टी – 18

शिवसेना (ठाकरे गट) – 12

काँग्रेस – 22

राष्ट्रवादी – 10

एकूणच पाहता, राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये युती, आघाडी, स्वबळावरची लढत आणि बंडखोरी यांचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. आगामी मतदानात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

• राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत संपली
• सर्व प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले
• उमेदवारी अर्जांसाठी दिवसभर मोठी धावपळ पाहायला मिळाली
• अनेक ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी उफाळली
• काही ठिकाणी अपक्ष उमेदवार स्वतंत्र लढतीच्या रिंगणात उतरले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com