अमित ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अमित ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

आज पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

आज पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, आदरणीय राज साहेबांनी 9 तारखेला मुंबईमध्ये जी सभा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त सभा झाली. त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा मोदीजींना आणि महायुतीला दिला. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये अमितजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेत. आज आमची त्यांची भेट झाली. त्यांची भेट घ्यायला या ठिकाणी आलो. आमची चांगली भेट झाली. अमित साहेबांनी असं सांगितले की, तुम्ही निश्चिंत राहा. आमची सगळी मंडळी आम्ही स्वत: ताकदीने तुमच्या मागे उभे राहणार आहोत. त्यामुळे आम्हालाही आज एक अधिक आत्मविश्वास आमचा वाढला. आमचा विजय अधिक सोप्पा झाला. कारण स्वत: राज साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे.

यासोबतच मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक संघटनात्मक वेगळी ताकद गेल्या अनेक वर्षापासूनची पुण्यामध्ये आहे. ही संघटनात्मक ताकद ही मनोमिलनच्या माध्यमातून ही सगळी आम्ही एकत्र काम करणार. मला असं वाटते की, निश्चितपणे या विजयाचे मोठ्या विजयामध्ये रुपांतर आता झाल्याशिवाय राहणार नाही. अमित साहेबांशी काही चर्चा आमची झाली. त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात. निवडणुकीची रणनिती काय असावी यासंदर्भातही आमचं बोलणं झालं. मी त्यांना शब्द दिला, विश्वास दिला आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे अगदी एका दिशेनं, एका दिलानं सगळी आम्ही काम करु आणि निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असा विजय आम्ही या ठिकाणी मिळवू. असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com