धक्कादायक! गुप्तधनाच्या लालसेपोटी 9 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या

धक्कादायक! गुप्तधनाच्या लालसेपोटी 9 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या

गुप्तधनाच्या लालसेपोटी 9 वर्षीय मुलाचे अपहरण करून याचा नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

महेश महाले| नाशिक: गुप्तधनाच्या लालसेपोटी 9 वर्षीय मुलाचे अपहरण करून याचा नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचं अपहरण करून नरबळी दिल्याच्या आरोपावरून बाप, लेक, मेहुणा आणि भोंदुबाबा यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

गेल्या आठवड्यात रविवारी १६ जुलै रोजी कृष्णा सोनवणे हा ९ वर्षाचा मुलगा शेतात जातो म्हणून घरातून गेला होता. त्यानंतर दिवसभर तो घरी परतला नाही आणि बेपत्ता झाला होता. दोन दिवसांनी १८ जुलै रोजी त्याचा मृतेदह मालेगाव येथील पोहाणे गावच्या शिवारात आढळला होता. गळा चिरलेल्या आणि मातीच्या ढिगाऱ्यात पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं नरबळीची शंका व्यक्त केली जात होती.

कृष्णा शेतात गेल्यानंतर तो सायंकाळपर्यंत घरी परतला नव्हता. शोध घेऊनही तो न सापडल्याने वडिलांनी पोलिसात धाव घेत मुलगा पळवून नेल्याची किंवा त्याचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी कृष्णाचा शोध सुरू केला.

दरम्यान, वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विहिरीजवळ जमिनीत पुरलेल्या अवस्थेत कृष्णाचा मृतदेह आढळला. वन विभागाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कृष्णाचा मृतदेह आढळल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या गळ्यावर खुणा असल्याने नरबळीचा संशय व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून नरबळी प्रकरणी भोंदुबाबासह चौघांना अटक केलीय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com