Sudhir Mungantiwar on Vedanta Foxconn
Sudhir Mungantiwar on Vedanta FoxconnTeam Lokshahi

Vedanta Foxconn: मविआ सरकार या प्रकल्पासाठी उदासीन होतं - सुधीर मुनगंटीवार

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात होणारी तब्बल पावणे दोन लाख कोटींच्या गुंतवणूकीला महाराष्ट्र मुकणार आहे.
Published by :
Vikrant Shinde

वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्यातून बाहेर जात असल्याची माहिती काल समोर आली. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. काही दिवसांपुर्वी सत्ता गमावलेल्या महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांकडून अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून शिंदे-फडणवीस सरकारवर या गोष्टीचं खापर फोडलं जातंय तर, 'मागील वर्षभरात सरकारकडून कंपनीशी पुरेसा संवाद न झाल्यानं हे प्रोजेक्ट गुजरातला जात असल्याचं' वक्तव्य उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांनी केलं आहे. आता या प्रकरणासंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Sudhir Mungantiwar on Vedanta Foxconn
Vedanta Foxconn प्रकरणावरून युवासेना आक्रमक; वरुण सरदेसाई करणार नेतृत्त्व

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

"गेले आठ महिने जेव्हा राज्यसरकारकडे येऊन व्यावसायिक महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करत होते तेव्हा त्यासंदर्भातील राज्य सरकारची (मविआ सरकारची) असलेली उदासीन भुमिका व गुंतवणुकीसंदर्भात नसलेली गंभीरता याचा हा परिणाम आहे. जेव्हा महाराष्ट्रातील हे सरकार अश्याप्रकारे वाटाघाटी करत होते त्याचवेळी गुजरातमध्ये ते अतिशय गंभीरतेने कंपनीशी चर्चा करत होते." यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्राकडून निसटून गुजरातकडे गेला.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात होणारी तब्बल पावणे दोन लाख कोटींच्या गुंतवणूकीला महाराष्ट्र मुकणार आहे. तर, जवळपास 1 लाख रोजगाराच्या संधीही आता महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये उपलब्ध होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com