Nagpur : नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल आला असून जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेल आयडीवर हा मेल आल्याची माहिती मिळत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून न्यायालय परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची माहिती मिळत असून त्यामुळे कोणीतरी खोडसरपणा करण्यासाठी हा मेल पाठवला का? याचाही तपास सुरू करण्यात आली आहे.
Summery
नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल
जिल्हा सत्र न्यायालयाला मेल आल्याची माहिती
सरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात पोलिस सुरक्षेत वाढ
