Nagpur
Nagpur

Nagpur : नागपूर महापौर, उपमहापौरांची आज होणार निवड; नागपूर महानगर पालिकेत असणार महिला राज

नागपूर महापौर, उपमहापौरांची आज निवड होणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nagpur ) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता नागपूर महापौर, उपमहापौरांची आज निवड होणार असून तब्बल 4 वर्षानंतर नागपूरला महापौर, उपमहापौर मिळणार आहेत.

आज मनपाची पहिली विशेष सभा पार पडणार असून या सभेत महापौर, उपमहापौर यांची निवड करण्यात येणार आहे. नागपूर महानगर पालिकेत यावेळी महिला राज पाहायला मिळणार आहे.

भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर पदी भाजपच्या नीता ठाकरे तर उपमहापौर पदी लीला हाथीबेड यांची निवड जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • नागपूर महापौर, उपमहापौरांची आज होणार निवड

  • तब्बल 4 वर्षानंतर मिळणार महापौर, उपमहापौर

  • नागपूर महानगर पालिकेत असणार महिला राज

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com