महिला कर्मचाऱ्यांकडे टक लावून बघितल्यास होणार निलंबन

महिला कर्मचाऱ्यांकडे टक लावून बघितल्यास होणार निलंबन

सहकारी महिला कर्मचाऱ्याकडे टक लावून बघणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महागात पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महापालिकेत महिला तक्रार निवारण समितीचे गठण करण्यात आले असून सर्वच झोन कार्यालये, विभागात फलक लावण्यात येणार आहे. प्रशासकीय कार्यालय किंवा झोन कार्यालयात हजारो महिला कर्मचारी, अधिकारी आहेत. सहकारी महिला कर्मचाऱ्याकडे टक लावून बघितल्यास आता थेट निलंबन करण्यात येणार आहे.

एखाद्या विभागात महिला कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन करणे, लैंगिकता सूचक स्पर्श, फोनवरून किंवा प्रत्यक्षात अश्लील संभाषण, शेरेबाजी, अश्लील विनोद सांगणे, टक लावून पाहणे, केल्यास महिला तक्रार निवारण समिती संबंधित महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेणार आहे.

त्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी मनपा महिला तक्रार निवारण समितीचे गठण केले आहे.याबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com