Nana Patole | बदलापूर प्रकरणातील आरोपींंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न केले, नाना पटोलेंचा आरोप
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांना जबाबदार धरलं आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांची स्वसंरक्षणार्थ गोळीबाराची भूमिका संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयीन चौकशी समितीने नोंदवले आहेत. यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, बदलापूरच्या घटना खऱ्या अर्थाने राज्याला काळिमा फासणारी होती, सरकारचे पोसलेले भक्षकाना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे फिंगरप्रिट नसल्याचं समोर आले. आरोपीना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे. असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून, आरोपीवर कारवाई व्हावी अशी काँग्रेसची मागणी आहे.
दरम्यान, पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी बळप्रयोग केला तो चुकीचा होता, असं कोर्टाने म्हटलंय. यावेळी जी बंदुक मिळाली होती, त्यावर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट पूर्णपणे नव्हते, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. पोलिसांनी दावा केला होता की अक्षय शिंदेंचे बंदुकवर फिंगर प्रिंट होते. मात्र, फॉरेन्सिक अहवालात पोलिसांचा दावा खोटा ठरला आहे.