Nana Patole Team Lokshahi
ताज्या बातम्या
पण आमची मोठ्या भावाची भूमिका नाही; नाना पटोलेंनी सरळ सांगितले...
महविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहाण भाऊ आणि मोठा भाऊ नेमकं कोण यावरुन चर्चा सुरु झाली होती.
महविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहाण भाऊ आणि मोठा भाऊ नेमकं कोण यावरुन चर्चा सुरु झाली होती. यावरुन राजकीय वर्तळातून अनेक प्रतिक्रिया देखिल येत होत्या.
याच पार्श्वभूमीवर आता एका माध्यमाशी बोलताना नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसची नेहमी देश हिताची भूमिका राहिली आहे. दोन तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा अनेक घडामोडी घडत असतात.आम्हाला देश वाचवायचा आहे. असे पटोले म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, मोठा भाऊ असा कधी आम्ही आव आणला नाही. आम्हाला मोठ्यापणाचा गर्व नाही. काँग्रेसची नेहमी देश हिताची भूमिका राहिली आहे. असे नाना पटोले म्हणाले.