Nanded Crime Love Story
Nanded Crime Love StoryNanded Crime Love Story

Nanded Crime Love Story : नांदेड प्रेमप्रकरणाची भीषण शेवट, सक्षम ताटेच्या न्यायासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात? अंजली आंबेडकर म्हणाल्या…

भागात गेल्या आठवड्यात सक्षम ताटे नावाच्या तरुणाची हृदयद्रावक हत्या झाली. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीशी प्रेमसंबंध होते.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Nanded Crime Love Story) नांदेडच्या इतवारा भागात गेल्या आठवड्यात सक्षम ताटे नावाच्या तरुणाची हृदयद्रावक हत्या झाली. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीशी प्रेमसंबंध होते, पण त्यांच्या जातीतील फरकामुळे आचलच्या कुटुंबाने हा संबंध मान्य केला नाही. परिणामी, गुरुवारी संध्याकाळी आचलच्या वडिलांनी आणि भावाने सक्षमवर गोळीबार करून, डोक्यात मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

सक्षमच्या अंत्यविधी दरम्यान आचलने त्याच्यासोबत प्रतीकात्मक विवाहाचे विधी पार पाडले. या विधीत दोघांना हळदी-कुंकू लावण्यात आले आणि आचलने कपाळावर सक्षमचे नावाचे कुंकू लावले. या व्हिडिओने देशभर लक्ष वेधले आणि जातीय असंतोषातून निर्माण झालेल्या घटनेवर सामाजिक चर्चेला वेग आला. या पार्श्वभूमीवर, बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी सक्षम ताटेच्या कुटुंबाला भेट दिली. पत्रकारांशी बोलताना, त्यांनी सांगितले की आचल मामीडवार आणि सक्षमच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही लढाई करणार आहोत.

सक्षमचे कुटुंब सध्या मोठ्या धोक्याखाली आहे. कारण, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला लवकर सुटण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे सक्षमच्या कुटुंबीयांचा तसेच आचलचा जीव धोक्यात आहे. पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अंजली आंबेडकर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडी आचलच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलणार आहे.

पत्रकारांनी विचारले की, सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात लढणार का? यावर अंजली आंबेडकर म्हणाल्या की, जर वंचित बहुजन आघाडी पाठशी असेल, तर त्याची फारशी गरज नाही. पण सक्षमच्या कुटुंबीयांनी ही मागणी व्यक्त केली आहे, ती मी साहेबांना कळवेन.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com