Nanded Crime : नांदेडमध्ये जातीय द्वेषातून प्रियकराची हत्या; प्रियसीने मृतदेहासोबत केलं लग्न, कपाळावर कुंकू तर अंगाला हळद...
प्रेमसंबंधातून अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतू नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सक्षम ताटे असे खून हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. या तरुणाचे पाठलाग करुन त्याचा खून केला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आला तसेच डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या केली. सक्षमचे आंचल मामीलवाड नावाच्या तरुणीवर प्रेम होते. तसाच तो तरुणीचा भावाचा मित्र देखील होता. आपल्या बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याचे समजले. आंचलच्या वडिलांनी सक्षमला आपल्या मुलीपासून दूर राहण्याचे सांगितले होते, मात्र दोघांचे प्रेमप्रकरण सुरुच होते. यांची कुणकुण आंचलच्या वडिलांना लागली. त्यांनी सक्षमला एका ठिकाणी बोलावून घेतले. त्याठिकाणी गजानन मामीलवाड, साहिल मामीलवाड आणि अन्य तिघे उपस्थितीत होते. त्यांनंतर त्यांनी सक्षमवर 3 गोळ्या झाडल्या तसेच त्याच्या डोक्यात फरशी टाकून सक्षमची हत्या केली.
अत्यंविधीसाठी सक्षमचा मृतदेह घरी आल्यानंतर प्रियसी आंचलने जे काही कृत्य केलं. त्याने नक्कीच हादरून टाकणारे आहे. तिने मृतदेहासोबत लग्न केले. सक्षमाच्या नावाचे कुंकू तिने कपाळावर लावले. सक्षमाच्या अंगाला लावली हळद तिने स्व:ताच्या अंगाला लावली हे दृश्य पाहून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांच्या अश्रु अनावर झाले होते.
नेमकं प्रकरण काय?
सक्षम आणि आंचल गेल्या तीन वर्षापासून एकामेकांवर प्रेम करत होते. पण सक्षमची जात वेगळी असल्या कारणाने आंचलच्या घरी मान्य नव्हते. सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते, असे आंचलने सांगितले आहे. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचलने केली आहे. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड,साहील ठाकूर,सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत.

