Nanded:शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस, देवीच्या आगमनाने शहरात उत्साहाचे रंग

साडेतीन शक्तिपीठांपैकी माहूर गडावरचे रेणुका माता मंदिर भाविकांनी फुलून गेले. नवरात्रीत नऊ दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू.
Published by :
Team Lokshahi
  • माहूर गडावरील रेणुका माता शक्तिपीठात नवरात्रीचा उत्साह शिगेला.

  • देशभरातून भाविक दाखल; दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी.

  • नऊ दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.

नांदेडच्या माहूर गडावर नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजेच रेणुका माता. नऊ दिवस माहूरगडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलझेल सुरु झाली आहे. रेणुका माता शक्तिपीठ पूर्ण आणि मुळपीठ असल्याने पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळालेली आहे.

सकाळी 8 पासून मातेच्या पूजेला सुरुवात झाली आहे. रेणुका मातेसाठी वस्त्र अलंकार या सर्वांसह मोठी भव्य पुजा पार पडली असून नऊ दिवस भजन संघाचा कार्यक्रम सातत्याने पार पडतो. रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक महाराष्ट्रासह पूर्ण देशभरातून येतात. यामुळे मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांची नीट व्यवस्था केली आहे.

नवरात्र हा उत्सव देवीचे आगमन दर्शवतो, हा दिवस शुभता आणि आनंद आणतो. त्यासह लोकांना देवीच्या आशीर्वादाने जीवनात सुख व समाधान मिळते. रेणुका देवी दयाळू आणि सर्वांचे कल्याण करणारी आहे. भक्त तिच्या चरणी प्रेमाने नतमस्तक होतात. रेणूका देवीच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी येते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com