स्वच्छता अभियान सुरु असताना कोकण किनारपट्टीवर पुन्हा आढळले अंमली पदार्थ

स्वच्छता अभियान सुरु असताना कोकण किनारपट्टीवर पुन्हा आढळले अंमली पदार्थ

रायगडमध्ये स्वच्छता अभियान सुरु असताना चरसचं पाकिटं सापडली आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत गोरेगावकर, रायगड

रायगडमध्ये स्वच्छता अभियान सुरु असताना चरसचं पाकिटं सापडली आहेत. अलिबागच्या वरसोली समुद्रकिनारी ही पाकिटे आढळली आहेत. रायगड जिल्हा परिषदेमार्फत हे स्वच्छता अभियान सुरु होते.

काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर अंमली पदार्थ आढळलं होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. सापडलेली पाकिटे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com