ताज्या बातम्या
Naresh Mhaske On Shivsena :'भाकरी हिंदुत्वाची चाकरी काँग्रेसची; म्हस्केंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका
नरेश मस्के यांची शिवसेनेवर टीका: हिंदुत्वाची भाकरी, काँग्रेसच्या विचारांची चाकरी!
शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटावर टिकास्त्र केले आहे. नरेश मस्के म्हणाले की, "भाकरी हिंदुत्त्वाची करतात. चाकरी ही मंडळी कॉंग्रेसच्या पुरोगामी विचारांशी करतात. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते करत आहेत. मुळात त्यांची भूमिका आहे का? कॉंग्रेस नेते राहूल गांधी जे सांगतील ते ही लोक करतात हीच त्यांची भूमिका आहे", असे नरेश मस्के यांनी म्हटले आहे.