नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आज पुन्हा घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी बारा वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. हेमंत गोडसे हे नाशिकच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत पेच कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

खासदार हेमंत गोडसे पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com