Nashik : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी

Nashik : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीची मतमोजणी पार पडली.
Published by :
Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल लागला. नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झाले. किशोर दराडेंना 26 हजारांहून अधिक मतं मिळाली. पसंतीक्रमाच्या दुसऱ्या फेरीत किशोर दराडेंचा विजय झाला. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा पराभव झाला.

यातच मतमोजणी सुरु असताना मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त सापडल्या होत्या यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी काही काळ मजमोजणी थांबली होती मात्र नंतर मतमोजणी सुरळीत झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com