राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले, समितीच्या बैठकीत अनेकजण गैरहजर होते म्हणून...
Admin

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले, समितीच्या बैठकीत अनेकजण गैरहजर होते म्हणून...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर विशेष समितीची बैठक सध्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरु आहे. यावर महेश तपासे म्हणाले आहेत की, समितीची आज बैठक झाली त्यात काही चर्चाही झाली. पण या बैठकीला आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळं उद्या पुन्हा या संदर्भात चर्चा होईल. समितीची बैठकही सुरु आहे, पण उद्या किंवा परवा यातील ठोस भूमिका समोर येईल.असे तपासे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com