Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचे लोकापर्ण
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचे लोकापर्ण; जाणून घ्या विमानतळाची वैशिष्टये कोणते? Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचे लोकापर्ण; जाणून घ्या विमानतळाची वैशिष्टये कोणते?

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचे लोकापर्ण; जाणून घ्या विमानतळाची वैशिष्टये कोणते?

नवी मुंबईतील विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य विमानतळाचे लोकापर्ण केले जाणार आहे. प्रत्यक्षात हे विमानतळावरून उडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Navi Mumbai Airport : नवी मुंबईतील विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य विमानतळाचे लोकापर्ण केले जाणार आहे. प्रत्यक्षात हे विमानतळावरून उडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या उद्घाटनावेळी महाराष्ट्रातील प्रमुख मान्य उद्योगजगत या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. हे विमानतळ देशातील सर्वात आधुनिक आणि पर्यावरणपूरक विमानतळांपैकी एक मानले जाते. टर्मिनल्स आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि प्रवाशांना मेट्रो स्टेशनवर थेट चेक-इन, एक-अप आणि दोन-मार्गी सामान सुविधा यासारख्या सुविधांचा आनंद घेता येईल. तर अदानी समूह आणि सिडको यांनी मिळून हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलेले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतच्या महत्वाच्या गोष्टी

1. प्रवासी क्षमता आणि रनवेची लांबी

- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेशास सेवा देणारे दुसरे विमानतळ आहे. सुरुवातीच्या टप्प्यात येथे रन-वे आणि टर्मिनल इमारत उभारण्यात आलीय. 

* वर्षाला 9 कोटी प्रवासी येथून प्रवास करू शकतील, इतकी या विमानतळाची क्षमता आहे.  

* विमानतळाच्या रनवेची लांबी 3,700 मीटर इतकी आहे.

* आधुनिक प्रवासी टर्मिनल्स आणि प्रगत हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली देखील उपलब्ध आहे.

2. प्रमुख विमान कंपन्या देणार सेवा 

* इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस यासह प्रमुख विमान कंपन्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. 

* या कंपन्या प्रमुख देशांतर्गत ठिकाणांना जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

3. कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा

विमानतळावरील कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केली जातेय. तंत्रज्ञानावर आधारित कार्गो सुविधा ज्यामध्ये प्रगत प्रणाली, विश्रामगृहांसह विविध अत्याधुनिक गोष्टींचा समावेश आहे. 

4. मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी विमानतळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात 'मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी' निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये एक्सप्रेस-वे, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे नेटवर्क तसेच जलवाहतूक सेवांचा समावेश आहे. मेट्रो स्टेशनपासून विमानतळापर्यंत बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. 

5. विमानतळाचे खास डिझाइन 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वास्तुकला ही आपले राष्ट्रीय फुल कमळाच्या फुलापासून प्रेरित आहे, ज्याचे भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com