Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांची चाचणी संपन्न; 1600 जण प्रवासी सहभागी, 'या' दिवशीपासून उड्डाणांना सुरुवात

Navi Mumbai Airport Trials: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६०० प्रवाशांसह मोठी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. चेक-इनपासून बॅगेज क्लेमपर्यंत सर्व प्रक्रिया तपासण्यात आल्या.
Published by :
Team Lokshahi

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची एकत्रित चाचणी शनिवार आणि रविवारी म्हणजेच २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी पार पडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होण्याच्या दिशेने प्रगती करत आहे. या चाचणीचा उद्देश विमानतळाच्या संपूर्ण प्रक्रियेचे परीक्षण करणे होते आणि तिथून मिळालेल्या अनुभवावरून उड्डाणे सुरळीतपणे सुरू होणे सुनिश्चित करणे होते. 25 डिसेंबर पर्यंत नियमित उड्डाणांना सुरुवात होणार असून प्रवाशांची यशस्वी चाचणी निर्णायक मानली जात आहे.

रंगीत तालीम करताना 1600 जणांना प्रवासी म्हणून सहभागी करण्यात आले होते. त्यांनी प्रवाशांचे चेक इन , सुरक्षा तपासणी, बोर्डिंग, बॅगेज क्लेम करण्यापर्यंतच्या कृतीची रंगीत तालीम करण्यात आली. विमानतळावरील सर्व महत्त्वाच्या प्रक्रियांच्या बारकाईने तपास करुन त्यातील कोणत्याही त्रुटी निश्चित केल्या गेल्या. यामुळे येथील सेवा गुणवत्ता आणि सुरक्षितता स्तर याकडे खूप लक्ष दिले गेले आहे. ही चाचणी विमानतळाच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची होती. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्याने नवी मुंबईच्या विकासात मोठा टप्पा सिद्ध झाला आहे.

हे देशातील सर्वात मोठे हरित आणि अत्याधुनिक विमानतळ ठरणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईत प्रवास करणार्‍यांसाठी एक आधुनिक आणि सुविधा संपन्न विमानतळ मिळणार आहे, जे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरिता उपयुक्त ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com