Navi Mumbai Metro : बेलापूर ते पेंढार मेट्रोला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; जाणून घ्या तिकीट दर

Navi Mumbai Metro : बेलापूर ते पेंढार मेट्रोला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; जाणून घ्या तिकीट दर

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत चार उन्नत मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत चार उन्नत मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होणार आहे. 14 किंवा 15 ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा होणार असल्याची शक्यता आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमध्ये बैठक झाली. बेलापूर ते पेंढार या 11 कि.मी. पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला आहे. या मार्गाचे काम दोन टप्प्यात पूर्ण झाले आहे.

प्रति 2 किलोमीटर भाडे 5 रुपये आहे अशी माहिती आहेय. 2 किलोमीटरसाठी 10 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपये असणार आहे. तर 10 किमीच्या पुढे भाडे 40 रुपये, बेलापूर ते पेंढार दरम्यानचे भाडे 40 रुपये असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com