खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

खासदार नवनीत राणा आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदार नवनीत राणा आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपुरातील नमो युवा संमेलनादरम्यान प्रवेशाची शक्यता आहे. हजारो समर्थकांसह नवनीत राणा नागपूर येथे भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.

याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश नाही. नवनीत राणा आणि भाजपच्या सर्व मित्र पक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावलं आहे. नवनीत राणा यांना सुद्धा संमेलनाचा निमंत्रण दिला आहे. इथे कोणताही पक्षप्रवेश नाही सहयोगी म्हणून ते येतील. असे बावनकुळे म्हणाले.

अमरावतीत खासदार नवनीत राणा जोरदार शक्ती प्रदर्शन करत नागपूरला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा आज नागपूर येथे होणाऱ्या भाजपच्या नमो युवा संमेलनात उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com