बाळासाहेबांच्या कष्टाची उद्धव यांनी माती केली; उध्दवजी तुम किस खेत की मूली हो? - नवनीत राणा
Admin

बाळासाहेबांच्या कष्टाची उद्धव यांनी माती केली; उध्दवजी तुम किस खेत की मूली हो? - नवनीत राणा

आज हनुमान जयंतीनिमित्ताने हनुमानाची मूर्ती बसवली जाणार.
Published by :
Siddhi Naringrekar

आज हनुमान जयंतीच्या व खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमानाची मूर्ती बसवली जाणार आहे. राणा दाम्पत्य यांनी या ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण केले. या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या की, लढणं म्हणजे काय हे बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं. उद्धव ठाकरे अत्याचारी मुख्यमंत्री होते. मुलं विचारायची आई तु कुठला गुन्हा केलास. जेलमध्ये टाकूनही मला तोडू शकले नाही. असे नवनीत राणा म्हणाले.

पुढे त्या म्हणाल्या की, हनुमानाची मूर्ती बसवण्याचाय निर्णय जेलमध्येच घेतला. मी रडण्यासाठी नाही लढण्यासाठी आहे. उद्धवजी तुमच्यातला गर्व देवानेच ठेचला. उद्धव ठाकरे पक्ष आणि विचारधारा सांभाळू शकला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com