राणा दाम्पत्याने साड्या वाटल्या की मच्छरदाणी? आदिवासी महिलांचा सवाल

राणा दाम्पत्याने साड्या वाटल्या की मच्छरदाणी? आदिवासी महिलांचा सवाल

दरवर्षी होळीच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा मेळघाटमधील आदिवासी बांधवांबरोबर हा सण साजरा करत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

दरवर्षी होळीच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा मेळघाटमधील आदिवासी बांधवांबरोबर हा सण साजरा करत असतात. यावेळी होळीच्या काळात लोकसभेची आचारसंहीता लागण्याची शक्यता असल्याने यावेळी होळीपुर्वीच नवनीत राणा व रवी राणा यांनी मेळघाटमध्ये जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली.

यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र यावेळी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांचे व्हिडीओ आता समोर आले आहेत, ही साडी आहे की मच्छरदाणी? असा प्रश्न आता या आदिवासी महिलांना पडला आहे. कारण अतिशय निकृष्ट दर्जाच्या या साड्या असल्याचे यावेळी व्हिडिओ मधून दिसत आहे.

त्यामुळे राणा दाम्पत्याबद्दल प्रचंड असा रोष आदिवासी बांधवांनी व्यक्त केला. अनेक साड्या ज्या फाटल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com