Navneet Rana : "किसी के हात ना आयेगी ये लडकी..." हातात छत्री अन् रिमझिम पावसात नवनीत राणांचा भन्नाट डान्स

Navneet Rana : "किसी के हात ना आयेगी ये लडकी..." हातात छत्री अन् रिमझिम पावसात नवनीत राणांचा भन्नाट डान्स

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा एक डान्स करतानाचा रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रचंड धुमाकूळ या व्हिडीओने सोशल मीडियावर घातला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

सध्या राजकारणातून नव नवीन घडामोडी घडत आहेत. अशातच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा एक डान्स करतानाचा रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रचंड धुमाकूळ या व्हिडीओने सोशल मीडियावर घातला आहे. नवनीत राणा या स्वतः अभिनेत्री असल्याने हुबेहूब त्या चालबाज चित्रपटातील या गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांच्या सारखाच त्यांनी नृत्य केलं आहे

गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर पांढरी छत्री घेऊन नवनीत राणा यांचा किसी के हात ना आयेगी ये लडकी... या गाण्यावर नवनीत राणा डान्स करताना दिसत आहे, सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक समस्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहे, लाखो लोकांनी हा व्हिडिओ काही वेळातच बघितला आहे, मात्र हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे हे कळू शकले नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com