अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार जाणार? आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना देणार? राजकीय चर्चांना उधाण
Admin

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार जाणार? आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना देणार? राजकीय चर्चांना उधाण

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमी समोर येत आहे की, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार जाणार आहेत. तसेच योग्यवेळी आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना देणार असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच अजित पवारांनी वैयक्तिकरित्या आमदारांशी संपर्क साधला आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com