5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये; उर्फी जावेद वादात आता आव्हाडांची उडी

5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये; उर्फी जावेद वादात आता आव्हाडांची उडी

सध्या उर्फी जावेद (Urfi Javed) हा विषय खूप चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून वातावरण खूप तापले आहे.

सध्या उर्फी जावेद (Urfi Javed) हा विषय खूप चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून वातावरण खूप तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. ट्विट करत त्यांनी उर्फीवर निशाणा साधला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. याच मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर देखील टीका केली होती.

याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एक ट्विट केलं आहे. ट्विट करत आव्हाड म्हणाले की, 'ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथेप्रमाणे झाकताच येत नव्हते ... घटकंचुकीची माहिती द्या की नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मनाप्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणाऱ्यांनी भुंकू नये' अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com