Ajit Pawar
Ajit PawarTeam Lokshahi

पुणे शहराचे ‘जिजाऊ नगर’ नामांतर करावे का? अजित पवार म्हणाले...

पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. या नामांतराच्या वादावरून संपूर्ण पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून पुण्याच्या नामांतराची मागणी केली. पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार आहे, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणावले की, पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. पिंपरी चिंचवडलाही पुण्याचाच भाग समजले जाते. महत्त्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि मूळ विषय भरकटवायचे असे सुरू आहे. माझी विनंती आहे की सर्वांनीच समंजस भूमिका घेतली पाहिजे.

यासोबतच ” पुणे मिनी इंडिया आहे. मूळ पुणेकरांना काय वाटते याचाही विचार करावा लागेल. उगीचच बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचं ठरतं. कोणाचाही अनादर होणार नाही. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. सगळीच नावं चांगली आहेत. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com