अजित पवार पडणार राजकारणातून बाहेर ?

अजित पवार पडणार राजकारणातून बाहेर ?

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. आजच्या दिवशी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. आजच्या दिवशी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल म्हटले होते की, मी राष्ट्रवादीला हरवून दाखवेन जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, शिवसेनेचा केला तसा राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करेन. यावर प्रतिउत्तर देत अजित पवार म्हणाले होते की, बावनकुळे यांच्या आव्हानामुळे मला झोप लागत नाही. असे म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं. अब्दुल सत्तार हे दोषी आहेत. कुठल्या कालावधीत त्यांनी भ्रष्टाचार केला होता, .प्रकरण लक्षात आल्यानंतर विरोधकांचे कामच आहे सभागृहात उचलण्याचे असे अजित पवार म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे बोलल्यापासून मला झोपच येईना. बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, त्यामुळे मी विचार करतोय राजकारणच सोडावं. राजकारणातून संन्यास घ्यावा. 2024ला असा अपमान होण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com