रस्त्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे, पाटील व महाजनांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

रस्त्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे, पाटील व महाजनांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

खडसेंकडे भरपूर वेळ असल्याने इकडे तिकडे फिरत राहतात मात्र लवकरच खडसेंचे कारणामे समोर येणार गिरीश महाजनांचा खडसेंना सूचक इशारा
Published by :
Sagar Pradhan

मंगेश जोशी|जळगाव: शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्यावर केला आहे. खडसेंच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत आज पर्यंत खडसेंनी काही केलं नाही म्हणून मी शहरासाठी काहीतरी करतोय हे खडसेंना दाखवायचा आहे अशी टीका करत खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसी मधून त्यांनी शहरासाठी किती पैसे दिले ? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

तर गिरीश महाजन यांनी देखील खडसेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देत खडसेंना भरपूर वेळ असल्याने इकडे तिकडे फिरत राहतात मात्र त्यांचेही कारणामे लवकरच समोर येतील असा सूचक इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे. दरम्यान रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पुन्हा एकदा खडसे पाटील महाजन यांच्या ठिणगी पडली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com