राष्ट्रवादीचे काही नेते भाजपाच्या गळाला लागणार आहे; ‘या’ नेत्यानं केलं वक्तव्य

राष्ट्रवादीचे काही नेते भाजपाच्या गळाला लागणार आहे; ‘या’ नेत्यानं केलं वक्तव्य

राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.

राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अनेकजण काहीना काही मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेंना उधान आलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी नेहमी एकत्र असणार, हे विधान करुन जे गुमराह केलं जातं आहे, त्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. पहिल्या क्रमांकावर जयंत पाटील यांचं नाव आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेटम जयंत पाटलांना दिला तर ते भाजपमध्ये जायला कधीही तयार होतील. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com