Rohit Pawar
Rohit Pawar

रोहित पवारांचा भाजपवर घणाघात; बारामतीच्या सभेत म्हणाले, "सत्तेसाठी गुलामी स्वीकारणं..."

"लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे"
Published by :

लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. त्यामागे निवडणुकीची राजकीय रणनीती आहे का, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तुम्ही वाद निर्माण करता, कुटुंब फोडणं, पक्ष फोडणं, सत्तेसाठी गुलामी स्विकारणं, दिल्लीत जाऊन झुकणं, यातून आपल्याला काय मिळणार आहे, जे काही आहे ते नेत्यांना मिळणार आहे. आपल्या अडचणी तशाच राहणार आहेत. या सर्व वादात सत्ताबदल झाला. काही लोक विकासासाठी तिथे गेले, पण तुमचे दुधाचे भाव वाढले का? असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते बारामतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

बारामतीच्या सभेत जनतेला संबोधीत करताना पवार म्हणाले, माझ्या आजोबांना सोडणं मला योग्य वाटलं नाही. मी जर चुकीचा निर्णय आजा घेतला असता, तर माझ्या लहान मुलांनी पंधरा वर्षानंतर मला सांगितलं असतं, बाबा तुमचं खूप झालं. आता आम्ही मोठे झालो आहोत. तुम्ही दुसरं घर बघा, असंही झालं असतं. कारण आपण ज्या पद्धतीने वागतो, तशाच प्रकारे लहान मुलं किंवा पुढची पिढी अनुकरन करु शकतात. अशाप्रकारचा प्रभाव त्यांच्या जीवनावर किंवा विचारावर होऊ शकतो. आज जबाबदारीने आपल्या सर्वांना वागावं लागणार आहे.

हाच संदेश महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोक देणार आहेत. अनाजी पंथांबद्दल विकास भाऊंनी तुम्हाला सांगितलं, एक व्यक्ती नाही, ती एक वृत्ती आहे. त्या वृत्तीबद्दल मी जास्त बोलणार नाही. ती वृत्ती काय करते, तर समाजात वाद निर्माण करते. जातीधर्मात वाद निर्माण करते. जातीधर्मात वाद निर्माण झाल्यावर दंगल जेव्हा होते, त्या दंगलीत गरिबांची घरे जळतात. ज्या हातात दगड असतो आणि ज्याच्या डोक्यात दगड पडतो, तो सुद्धा गरीबच असतो.

या वादात इतकच होतं, काही राजकीय लोक एसीमध्ये बसून त्यांची राजकीय पोळी भाजतात. ही गोष्ट आपल्याला या निवडणुकीत होऊ द्यायची नाही. २०१९ ला कोरेगाव-भिमा प्रकरण घडलं. योगायोग आणि दुर्देव बघा,त्यावेळी सुद्धा सात-आठ महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होती. आख्ख्या महाराष्ट्रात आग पेटली. वातावरण तापलं. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपला लोकसभेला त्याचा फायदा झाला, असंही पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com