Supriya Sule, Bhagat Singh Koshyari
Supriya Sule, Bhagat Singh KoshyariTeam Lokshahi

महाराष्ट्रात असं कधी घडलंच नव्हतं, कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उशिरा का होईना राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. नवे येणारे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत दहा वर्षे काम केलं आहे. त्यामुळे त्यांनाही जाऊन भेटणार आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा पण महापुरुषांच्या बद्दल केलेले भाष्य अतिशय दुर्दवी आहे. महाराष्ट्राच्या इतिहास नाही देशातच सुद्धा असे काही झाले नाही असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.

Supriya Sule, Bhagat Singh Koshyari
'महाराष्ट्राची सुटका झाली' भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच शरद पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण राज्यात राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावरून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून कार्यमुक्त होण्याची विनंती केली होती. त्यावरून भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन तात्काळ हटवा अशी मागणीही होऊ लागली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com