Sharad Pawar Nitin Gadkari
Sharad Pawar Nitin Gadkari

योग जुळून आला... एकाच मंचावरून शरद पवार, नितीन गडकरींना दुसऱ्यांदा मानद

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एकाच मंचावरून अवघ्या 386 दिवसांत दुसऱ्यांदा मानद पदवी दिली जात आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

सचिन बडे :औरंगाबाद | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एकाच मंचावरून अवघ्या 386 दिवसांत दुसऱ्यांदा मानद पदवी दिली जात आहे.

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी 28 ऑक्टोबर 2021 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉक्टरेट ऑफ सायन्स (डीएससी) या पदवीने दोघांचा गौरव करण्यात आला होता. त्यानंतर वर्षभराने आज शनिवारी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे दोघांनाच ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ (डी. लिट.) दिली जाणार आहे.

रस्ते विकासात योगदान दिल्याबद्दल गडकरींचा आणि कृषी तंत्रज्ञानातील विकासामुळे शरद पवार यांना राहुरीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव झाला होता. आज औरंगाबादेत त्यांचा राज्यपालांच्या हस्तेच गौरव होणार आहे.या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गडकरी आणि शरद पवार 5 वर्षांपूर्वीही औरंगाबादेतच एकत्र आले होते. पवारांच्या संसदीय राजकारणाला 50 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर 27 जुलै 2017 रोजी देवगिरी महाविद्यालयात गडकरी यांच्या हस्ते पवारांचा गौरव करण्यात आला होता. आज योग जुळून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com