राष्ट्रवादीकडून शिंदे गटाला धक्का; शिंदे गटाची सत्ता आली मात्र सरपंचपदाचा उमेदवारच झाला पराभूत
Admin

राष्ट्रवादीकडून शिंदे गटाला धक्का; शिंदे गटाची सत्ता आली मात्र सरपंचपदाचा उमेदवारच झाला पराभूत

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कराडमधून एक मोठी बातमी येत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे गटाची सत्ता आली मात्र त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे प्राथामिक कल हाती आले असून जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे.

शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून १० जागांवर विजय मिळवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com