Loksabha Election 2024 Exit Poll
Loksabha Election 2024 Exit Poll

NDA ला बहुमत मिळणार? इंडिया आघाडी 'इतक्या' जागांनी पिछाडीवर; महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? वाचा लोकशाहीचा एक्झिट पोल

लोकशाहीच्या एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएला ३८० जागा मिळणार असून इंडिया आघाडीला १२३ जागा मिळणार आहेत. इतर पक्षांना ४० जागा मिळतील.
Published by :

Loksabha Election 2024 Lokshahi Exit Poll : देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (एनडीए) बाजी मारणार की काँग्रेसला (इंडिया आघाडी) बहुमत मिळणार, याचा निकाल अधिकृतरित्या येत्या ४ जूनला जाहीर होणार आहे. परंतु, लोकशाहीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुतांश जागा मिळणार असून इंडिया आघाडी पिछाडीवर असणार आहे.

लोकशाहीच्या एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएला ३८० जागा मिळणार असून इंडिया आघाडीला १२३ जागा मिळणार आहेत. इतर पक्षांना ४० जागा मिळतील. यामध्ये भाजपला ३२४, काँग्रेसला ६४, टीएमसीला १३, आम आदमी पक्षाला २ तर इतरसाठी ४० जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महायुतीला २१, मविआला २६ आणि इतरसाठी १ जागा मिळेल.

लोकसभा निवडणूक 543/543

एनडीए : 380

इंडिया आघाडी : 123

इतर : 40

भाजप : 324

काँग्रेस : 64

टीएमसी : 13

आम आदमी पक्ष : 2

इतर : 40

महाराष्ट्रातील एक्झिट पोल : 48/48

महायुती : 21

मविआ : 26

इतर : 1

महाराष्ट्रात मविआला ३४, तर महायुती १३ जागा जिंकणार, रुद्र रिसर्चचा पोल एकदा पाहाच

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पुण्यातील रुद्र रिसर्च संस्थेने एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३४ तर महायुतीला फक्त १३ जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्वेक्षणात बांधण्यात आला आहे. तसच महाराष्ट्रात एक अपक्ष उमेदवार विजयी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येईल.

रुद्र रिसर्च संस्थेच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील पक्षनिहाय अंदाज (टक्केवारीमध्ये)

महायुती - ४३ %

महाविकास आघाडी - ४६ %

वंचित बहुजन आघाडी - ३ %

इतर - ८ %

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ च्या सर्वेक्षणानुसार रुद्र रिसर्च संस्थेने महाराष्ट्रात भाजपला २६ %, शिवसेना (शिंदे गट) पक्षाला १२ %, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाला ३ %, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १८ %, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ११ %, वंचित बहुजन आघाडी पक्षाला ३ %, तर इतर उमेदवारांना ९ टक्के मतदान मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात भाजपला ९ जागा, शिवसेना शिंदे गट पक्षाला ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १ जागा, शिवसेना (ठाकरे गट) १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाला ८ जागा, काँग्रेसला १२ जागा आणि इतर-१ जागा मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com