निकाल जाहीर ! NEET 2025 मध्ये महेश कुमार AIR 1; अविका अग्रवाल मुलींमध्ये अव्वल

निकाल जाहीर ! NEET 2025 मध्ये महेश कुमार AIR 1; अविका अग्रवाल मुलींमध्ये अव्वल

या वर्षी NEET UG 2025 परीक्षेसाठी 22,76,069 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 22,09,318 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
Published by :
Shamal Sawant
Published on

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 14 जून 2025 रोजी NEET UG 2025 चा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. यंदाच्या परीक्षेत राजस्थानच्या महेश कुमारने बाजी मारत ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) पटकावली आहे. त्याने 99.9999547 टक्केवारी मिळवली आहे. दिल्लीच्या अविका अग्रवालने देखील उल्लेखनीय कामगिरी करत AIR 5 मिळवली असून, ती या वर्षीची मुलींमध्ये टॉपर ठरली आहे. तिचा स्कोअर 99.9996832 टक्केवारी आहे.

या वर्षी NEET UG 2025 परीक्षेसाठी 22,76,069 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 22,09,318 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 12,36,531 विद्यार्थ्यांनी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 5,14,063 मुले , 7,22,462 मुली , आणि 6 थर्ड जेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा भारतभरातील 557 शहरांमध्ये आणि 14 परदेशातील केंद्रांमध्ये मिळून 4,750 परीक्षा केंद्रांवर पार पडली.

NEET UG 2025 निकाल कसा पाहाल?

1. NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर nta.nic.in भेट द्या.

2. 'Examinations' विभागातून ‘NEET UG 2025’ लिंक निवडा.

3. neet.nta.nic.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड लिंकवर क्लिक करा.

4. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका व Submit करा.

5. आपला निकाल तपासा व PDF स्वरूपात डाउनलोड करा.

NEET UG ही भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असून, त्याद्वारे MBBS, BDS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com