PM Modi On Bihar Election Result : “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
थोडक्यात
बिहार विधानसभेत एनडीएने मिळवले प्रचंड बहुमत
दिल्लीतील भाजप मुख्यालयात साजरा केला गेला जल्लोष
भाजप बिहारमध्ये ठरला सर्वात मोठा पक्ष
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले आहे. एनडीने एकूण 203 जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला केवळ 36 जागा जिंकता आलेल्या आहेत. दरम्यान भाजप हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकूण 90 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही एनडीएचे लोक जनतेचे सेवक आहोत. आम्ही आमच्या मेहनतीने जनतेचे मन जिंकतो. हे संपूर्ण बिहारने दाखवून दिले आहे. आम्ही कामांमधून जनतेचा विश्वास जिंकतो. जंगलराज, कट्टा सरकारबाबत बोलताना आरजेडी कधी विरोध करत नसे. तर कॉँग्रेसवले टीका करत असायचे. मी पुन्हा म्हणतो कट्टा सरकार पुन्हा येणार नाही.”
