H3N2 नव्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली; आज नीती आयोगाची बैठक
Admin

H3N2 नव्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली; आज नीती आयोगाची बैठक

H3N2 नव्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

H3N2 नव्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली आहे. H3N2 इन्फ्लुएन्झामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे मृत्यू ओढविल्याचे प्रकार पहिल्यांदाच समोर आले आहे.

या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, H3N2हा नवा ताप देशासाठी नवी डोकेदुखी ठरू नये म्हणून आज (शनिवारी ) यासंदर्भात नीती आयोगाची बैठक होणार आहे.

H3N2 विषाणूच्या रुग्णसंख्येतील वाढ आरोग्य विभागाचा ताण वाढविणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी H3N2 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात तातडीची बैठक बोलावत सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com