पुण्यातील लवासा प्रकरणात नव्यानं याचिका दाखल; पवार कुटुंबाच्या सीबीआय चौकशीची मागणी
लवासा प्रकरणात पवार कुटुंबियाविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या’ पुण्यातील लवासा प्रकरणात मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांची मुंबई हायकोर्टात नव्यानं याचिका दाखल केली आहे. पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्पाबाबत याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप काही प्रमाणात खरे असले तरीही त्यांनी त्याला आव्हान देण्यास बराच उशीर केला आहे. असे निरीक्षण नोंदवत तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने लवासा विरोधातील याचिकेवर निकाल दिला होता.
लवसा प्रकरणी जनहित याचिका करणारे मूळ याचिकाकर्ते वकील ॲड. नानासाहेब जाधव यांनी नव्याने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजित गुलाबचंद यांच्या नावाचाही या याचिकेत यांचा समावेश आहे.
या निकालातील निष्कर्षांचा दाखला देऊन लवासा प्रकरणाशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसह शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली.

